पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : दिलासा केंद्र या दिव्यांग मुलांच्या शाळेत पालक सभा संपन्न झाली. या वेळी यावेळी दिव्यांगांच्या शासकीय व पुणे महानगरपालिकेच्या योजना विषयी माहिती पालकांना देण्यात आली.नंदकुमार फुले ( सेवानिवृत्त) महाराष्ट्र राज्य अपंग वित्त महामंडळ यांनी ” कायदेशीर पालकत्व व दिव्यांगांसाठी शासकीय योजना व सवलती ” याविषयी पालकांना मार्गदर्शन केले.

रमेश मुसूडगे ( समन्वयक ) जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औंध पुणे. यांनी केंद्र शासनाच्या नॅशनल ट्रस्टच्या “निरामया विमा योजना ” व यु डी आय डी कार्ड यांचे फायदे व ऑनलाइन फॉर्म कसा भरावा या विषयी पालकांना मार्गदर्शन केले. पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातील समूह संघटिकानी पुणे महानगरपालिकेच्या दिव्यांगांच्या योजना विषयी अधिक माहिती दिली.

या मार्गदर्शन पालक सभेस एकूण ७२ पालक, शिक्षक उपस्थित होते. दिलासा केंद्राच्या शालेय समितीच्या सदस्य सुचेता फासे, दिलासा केंद्राचे प्राचार्य विकास पवळे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतिभा शिंपी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनील मर्तनवार यांनी केले.
हे ही वाचा :
पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड
ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’
डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’
हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे
सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर






