Monday, December 23, 2024
Homeग्रामीणमाळशेज घाटात दरड कोसळली, एका कारचे मोठे नुकसान

माळशेज घाटात दरड कोसळली, एका कारचे मोठे नुकसान

माळशेज : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. आणखी पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. असे असताना आज माळशेज घाटामध्ये दरड कोसळण्याची घटना घडली.

आज (ता. ११) दुपारी माळशेज घाटामध्ये बोगद्याजवळ उभ्या असलेल्या एका पर्यटकाच्या गाडीवर मोठी दरड कोसळली, पर्यटक गाडी पार्क करून भ्रमंतीसाठी गेले होते त्यावेळी सुदैवाने गाडीमध्ये कोणीही नसल्याने यात कोणतीही जिवती हानी झालेली नाही. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.

संबंधित लेख

लोकप्रिय