Friday, September 20, 2024
HomeNewsमहाराष्ट्रातील 12 जणांना पद्म पुरस्कार; जाणून घ्या कोणाला मिळाला कुठला किताब?

महाराष्ट्रातील 12 जणांना पद्म पुरस्कार; जाणून घ्या कोणाला मिळाला कुठला किताब?

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 12 जणांना विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये एका व्यक्तीला पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण तर आठ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्रातून पद्मविभूषण आणि पद्मभूषणचे मानकरी

यामध्ये प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन यांना कला क्षेत्रातून पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर कुमार मंगलम बिर्ला (व्यापार आणि उद्योग), सुमन कल्याणपूर (कला), दिपक धर (विज्ञान आणि अभियांत्रिकी) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातून पद्मश्रीचे मानकरी

तर भिकू रामजी इदाते (समाजसेवा), राकेश झुनझुनवाला -मरणोत्तर (व्यापार आणि उद्योग), परशुराम खुने (कला), प्रभाकर भानुदास मांडे (साहित्य आणि शिक्षण), गजानन माने (समाजसेवा), रमेश पतंगे (साहित्य आणि शिक्षण), रवीना टंडन (कला), कुमी नरिमन वाडिया (कला) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय