चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:चिखली घरकुल येथील ‘हसनैन सोशल फौंडेशन’च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील सामाजिक-राजकीय प्रतिनिधी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी घरकुल मधील समाजसेवक निलेश नेवाळे,माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष इम्रान सय्यद,निहाल पानसरे,सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर,घरकुल फेडरेशन अध्यक्ष सुधाकर धुरी,आबासाहेब गवळी,युवराज निलवर्ण,अजय जाधव,नथुराम देसाई,सम्यक क्रांतीचेअध्यक्ष दशरथ शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे विजय गेडाम, शिवरक्त प्रतिष्ठान चेअध्यक्ष गणेश चौधरी,पेराकमांडो सावंत काका, विनायक शेडगे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
हसनैन सोशल फौंडेशनच्या वतीने मौलाना अब्दुल गफ्फार साहब,हाफिज महेमूद,असिफ शेख,सलीम मुलाणी,मुस्तफा कादरी,अमीर पठाण,अब्दुल पटेल ह्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यानचे सत्कार केले व सादिक शेख यांनी आभार व्यक्त केले.