Home नोकरी भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी; पहा काय आहे...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी; पहा काय आहे प्रक्रिया

Indian Armed Forces

मुंबई, दि. २७ : कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक १९ जून २०२३ ते दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दिनांक ७ व ८ जून २०२३ रोजी मुलाखतीस सकाळी १० ते दुपारी ०३ वाजेपर्यंत हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६१) कोर्ससाठी संबंधित परिशिष्टांची प्रत काढून व ते पूर्ण भरुन सोबत आणावे.

संघ लोक सेवा आयोग (युपीएससी), नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी दिनांक ०३ सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेकरिता (एम्प्लॉयमेंट न्यूज) रोजगार समाचार मध्ये जाहीरात प्रसिध्द झाली होती. संघ लोक सेवा आयोगाकडे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ०६ जून २०२३ अशी होती. ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी www.upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या दूरध्वनी क्रमांक 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

 मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती

 मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती

 मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

 मुंबई येथे टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत लिपिक व अन्य पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

एअर फोर्स स्कूल, एअर फोर्स स्टेशन ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

Exit mobile version