Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:मोशी-प्राधिकरण पेठ ६ मधील नागरिकांसाठी ‘ओपन स्पेस’,स्थानिक नागरिक, सोसायटीधारकांच्या मागणीला यश

PCMC:मोशी-प्राधिकरण पेठ ६ मधील नागरिकांसाठी ‘ओपन स्पेस’,स्थानिक नागरिक, सोसायटीधारकांच्या मागणीला यश

आमदार महेश लांडगे यांचा ‘पीएमआरडीए’ कडे पाठपुरावा

पिंपरी चिंचवड:क्रांतिकुमार कडुलकर-मोशी-प्राधिकरण पेठ क्रमांक ६ येथील स्थानिक नागरिकांच्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी २० गुंठे जागा राखीव करण्याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्यता दिली असून, संबंधित जागेचे रेखांकन करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

पेठ क्रमांक ६ व ९ मधील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, परिसरात मुलांच्या खेळण्यासाठी मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान किंवा सुविधा पार्क उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिका प्रशासानाने ३ ते ४ एकर जागेत पायाभूत सोयी-सुविधा विकसित करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनाही याकामी लक्ष घालण्याची विनंती केली होती.तसेच, या भागात असलेल्या दत्त मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांनीही या जागेत मूलभूत सुविधा विकसित करण्याची मागणी केली होती.

तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पेठ क्रमांक ६ चा नकाशा १९९९ साली मंजूर झाला होता. त्यानंतर दि. ७ जून २०२१ रोजी नवनगर विकास प्राधिकराचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विसर्जन झाले. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात याकडे दुर्लक्ष झाले.

जुलै- २०२२ मध्ये महायुतीची सत्ता राज्यात स्थापन झाल्यानंतर आमदार लांडगे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडे पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे पेठ क्रमांक ६ मधील १.४५ हे. आर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली.नकाशाप्रमाणे रहिवाशी जागेस भूखंड क्रमांक १८४ आणि १८५ व खुली जागा क्रमांंक ६ क्षेत्र ०.२० हे. आर. असे नकाशात बदल करुन रेखांकन करण्याचे आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल यांनी दिले आहेत. यामुळे सोसायटीधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.सेक्टर- ६ मधील जलवायू विहास सोयायटीचे किरीट पटेल,सेक्टर- ९ मधील साई पार्क सोसायटीचे दीपक नाईक,प्रगती एम्पायर सोसायटीचे बाळासाहेब पोखरकर,आदित्य वुड्स सोसायटीचे अनिल सैनदाने यांच्यासह स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, या ठिकाणी असलेल्या दत्तमंदिर येणाऱ्या भाविकांनीही आमदार लांडगे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया

परिसरात सुमारे १० हजार लोकवस्ती आहे. मात्र, प्राधिकरणात उद्यान, खेळासाठी मैदान किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुली जागा नाही. त्यामुळे या भागात ‘ओपन स्पेस’ असावी आणि पायाभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, अशी मागणी होती. त्याला यश मिळाले आहे. याकामी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार महेश लांडगे यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरात नियमितपणे भाविक येत असतात. त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा विकसित करावी, अशी अपेक्षा आहे.
कौतिक पाटील,रिद्धि-सिद्धी सोसायटी, सेक्टर- ६.

प्रतिक्रिया
आमच्या परिसरामध्ये गार्डन अथवा मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सुविधा विकसित करावी, अशी सोसायटीधारकांची मागणी होती. त्यानुसार आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आणि संबंधित भूखंड ‘ओपन स्पेस’ म्हणून विकसित करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे सोसायटीधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
संजय पाटील,यूनिटी एवेन्यू सोसायटी,सेक्टर- ६.

संबंधित लेख

लोकप्रिय