Friday, November 22, 2024
Homeआंबेगावस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा २१ फेब्रुवारीला प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा २१ फेब्रुवारीला प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा 

मंचर : बिबट्याच्या दहशतीखाली शेतकऱ्यांनी कसं जगायचं असं म्हणत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन २१ फेब्रुवारी २०२३ ला प्रांत कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शेतकरी नेते प्रभाकर बांगर यांनी दिली.

आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे : 

१. शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करा.

२. दिवसेंदिवस बिबट्याच्या संख्येमध्ये वाढ होत असून ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नर बिबट्यांची नसबंधी करा.

३. मोकाट फिरणाऱ्या बिबट्यांना पकडून निवार केंद्रांची संख्या वाढवा व त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करा . 

४. शेतकऱ्यांना शेती करता यावी व नागरिकांना निर्भयपणे जीवन जगता यावे या करिता वनविभाग, राज्यसरकार,  केंद्रसरकार यांनी ठोस उपाययोजना कराव्यात. 

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय