औरंगाबाद : 23 मार्च हा शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या शहिद दिनानिमित्त देशभरात भव्य रक्तदान शिबिर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने आयोजित करण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येते सुद्धा रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या वेळी विद्यार्थी विरंगुळा केंद्र येते शहीदा च्या प्रतिमेला अभिवादन करून उदघाटन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून शहिद भगतसिंग अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ.सुधाकर शेंडगे, विद्यापीठ एनएसएस प्रमुख आनंद देशमुख, डॉ. मुस्तजीभ खान, डॉ. हनुमंत सोनकांबळे इ. उपस्थित होते.
हा रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन वावले, रोहिदास जाधव, भगवान श्रावण, पौर्णिमा डोंगरे, मनीषा बल्लाळ, गणेश अलगुडे, श्रीनिवास लतंगे, पांचाळ धूनेशर,आकाश देशमुख, गजानन शिंदे, दिनेश भावले, अशोक शेरकर यांनी प्रयत्न केले.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्यांना एसएफआय कडून घेराव
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती