मुंबई : राज्यातील भूमिअभिलेख विभागाने सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फक्त शहरांसाठी असणार आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहरांमध्ये शेतजमिनीचे शिल्लक नसल्याने हा निर्णय घेतला आहे .
राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत, तरी देखील सातबारा उतारा सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करून त्याठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकवेळा सातबाराचे प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतर झाले असताना कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सातबाऱ्याचा वापर केला जातो. तसेच फसवणुकीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे भूमिअभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील हवेली तालुक्यासोबत सांगली, मिरज नाशिक पासून या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.