Tuesday, June 18, 2024
Homeताज्या बातम्याSchool nutrition : आता शालेय पोषण आहार होणार चवदार ! या १५...

School nutrition : आता शालेय पोषण आहार होणार चवदार ! या १५ खाद्यपदार्थांचा समावेश

पुणे : खिचडी, वरण-भात अशा मर्यादित खाद्यपदार्थांऐवजी आता शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना अधिक चवदार पदार्थ खायला मिळणार आहे. राज्य शासनाने शाळकरी मुलांचा पोषण आहारात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळकरी आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य आणि अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा, पौष्टिकता वाढवण्याता प्रयत्न करण्यात आला आहे. (School nutrition)

शालेय मुलांच्या पोषणासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यात येत आहेत.

शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला, फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होत आहे. तीन संरचित आहार पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार,

मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांच्यासह नविन पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पाककृती सुधारणा समितीने सुचविलेल्या 15 प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ घेता येणार आहे.

पाककृती नाव (School nutrition)

व्हेजिटेबल पुलाव
मसाले भात
मटार पुलाव
मुगडाळ खिचडी
चवळी खिचडी
चणा पुलाव
सोयाबीन पुलाव
अंडा पुलाव
मोड आलेल्या मटकीची उसळ
गोड खिचडी
मुग शेवगा वरण भात
तांदळाची खीर
नाचणीचे सत्व
मसुरी पुलाव
मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य

ब्रेकिंग : आता शालेय पोषण आहार होणार चवदार ! या १५ खाद्यपदार्थांचा समावेश

मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी, अर्ज दाखल

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय