Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Nilesh Rane : निलेश राणे यांच्यावर पुणे महापालिकेची मोठी कारवाई

पुणे : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) पुण्यातील आर डेक्कन मॉल प्रकरणात अडचणीत आले आहे. त्यांच्यावर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई शहरात एक चर्चेचा विषय बनली आहे. Nilesh Rane’s R Deccan Mall seal owes more than three crores tax from Pune Municipal Corporation

---Advertisement---

माजी खासदार निलेश राणे यांच्या नावावर असलेल्या शिवाजीनगर भागातील डेक्कन परिसरातील आर-डेक्कन मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलला मिळकतकर थकवल्याप्रकरणी राणे अडचणीत आले आहे. पुणे महापालिकेनं राणे पिता-पुत्राला नोटीस बजावली असून पुणे महापालिकेनं मॉलला टाळं ठोकलं आहे.

महापालिकेने त्यांना अनेक वेळा नोटीस देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेच्या करसंकलन विभागानं जोरदार कारवाई करून ही मिळकत सील केली आहे. महापालिकेने मिळकतीचे वरील तीन मजल्यापैकी दोन मिळकतीचे मजले सील करून ठेवले आहेत. कर संकलन विभागाने त्यांचे थकित मिळकतीचा भाग सील केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मिळकतीची तीन कोटी रुपयांहून अधिक बाकी थकली होती.

---Advertisement---

या प्रकरणावरून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी दिली जात होती. यामुळे पालिकेनं कोणतंही पाऊल पुढं टाकलं नाही. मात्र आता पालिकेनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत मिळकतीला टाळे लावले आहेत.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या या कारवाईनंतर उद्धव ठाकरे गटाकडून आर डेक्कन मॉलच्या बाहेर बँड वाजवून आंदोलन करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

ब्रेकिंग: निवेदनावर मुख्यमंत्री शिंदेंची खोटी सही, शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार

धक्कादायक : शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

ब्रेकिंग : हजारो आदिवासींचे आंदोलन; रस्त्यावरच पेटवल्या चूली

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे

मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles