Monday, December 23, 2024
Homeराज्यविद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ कारणामुळे राज्यातील 'या' ठिकाणच्या शाळा उशीराने होणार सुरू

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ कारणामुळे राज्यातील ‘या’ ठिकाणच्या शाळा उशीराने होणार सुरू

मुंबई : राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जूनपासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तर, दि. 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. 

शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दि. 13 ते 14 जून 2022 रोजी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 प्रादुर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबीच्या अनुषंगाने उद्बोधन करणे याचे नियोजन करण्यात यावे, अशा सुचना देण्यात आल्या आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

राज्यातील इतर ठिकाणच्या शाळा 13 जूनपासून सुरू होणार असल्या तरी मात्र, विदर्भातील शाळा या उशीराने सुरू होणार आहे. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष 23 जून रोजी सुरू होऊन चौथा सोमवार, दि. 27 जून 2022 रोजी पासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 27 जून पासून प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासन, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून देण्यात येणारे निर्देश / सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे/ पालकांचे कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने प्रबोधन/ उद्बोधन करण्यात यावे, असे निर्देशही मांढरे यांनी दिले आहेत.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

संबंधित लेख

लोकप्रिय