Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : डॉ.अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार; वाचा सविस्तर

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सहभागी झाला आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे-फडणवीस-पवार असं सरकार सध्या स्थापन झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मंगळवारी खासदारपदाचा राजीनामा देणार, असा मोठा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला आहे.

अमोल कोल्हे यांनी एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेद्वारे इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मी नैतिक मुल्याच्या बरोबरच राहणं मला योग्य वाटते. सर्व राजकारण पाहता आपण आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले. आपण वेगळ्या कारणासाठी अजित पवारांना भेटायला गेलो होतो, त्यावेळी आपणास कोणतीही कल्पना नव्हती की, आज शपथविधी आहे. तेथे गेल्यानंतर शपथविधी असल्याची माहिती समजली. त्याचवेळी आपण कार्यालयाला राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले होते. कारण मतदारांचा विश्वास तोडून यासाठी आपण राजकारणात आलेलो नाही, असं कोल्हे म्हणाले.

---Advertisement---

शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं आहे ते एका विचारधारेवर, विश्वास ठेवून केलं आहे. आपण विरोधी भूमिका घेतली आणि अचानक हे आपण कसे बदलू शकतो. म्हणून मी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांची डॉ. कोल्हे भेट घेऊन राजीनामा देणार आहेत.

हे ही वाचा :

---Advertisement---

मोठी बातमी : जयंत पाटलांना हटवलं, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी ‘यांची’ निवड

मोठी बातमी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली भावनिक पोस्ट, म्हणाले…

‘आम्ही अजितदादांबरोबर…’, बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी; मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव

मोठी बातमी : अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी स्पष्ट केली भुमिका, म्हणाले…

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू

कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा

हाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles