मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात अंतिम फैसला येणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच आणखीन एक मोठी बातमी पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेते ईडीच्या रडारवर आहेत. अशात आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
काय आहे प्रकरण ?
जयंत पाटील यांना आयएल ॲन्ड एफसी कंपनीप्रकरणात ईडीने नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राट देण्यात आली होती. त्यासोबत त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जयंत पाटील यांना उद्याचहजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.