पुणे : गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदींवरील भोंगे न काढल्यास तिथे हनुमान चालीसा लावू असे वक्तव्य केले होते. तसेच राज ठाकरेंनी यावेळेस बोलताना मशिदींवर त्याचप्रमाणे मदरशांवर छापे मारण्यासंदर्भात भाष्य केले होते. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले. आज राज ठाकरे यांच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे शहरातील कोंढवा येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली. ते म्हणाले, “मागील १५ वर्षांमध्ये ज्या पक्षाने स्वत:चा झेंडा दोनदा बदलला, ब्रीद वाक्य दोनदा बदलले, त्या पक्षातील कार्यकर्त्यांची गळती आता थांबू शकत नाही. त्यामुळेच भाजपची कुबडी होण्याचे किंवा त्यांना कुबडी देण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. हे मतदारांना ठाऊक असल्यामुळेच या आंदोलनात आज हिंदू- मुस्लीम बांधव एकत्रित सहभागी झालेले, या राज्यात हिंदू मुस्लीम वाद पेटतील, दंगल घडेल अशाप्रकारच्या रणनितीचा वापर करण्याचा प्रयत्न केला.
कोरोना उद्रेक : ‘या’ देशात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, तर चुंबन आणि एकत्र झोपण्यावरही बंदी
भाजपची सी टीम म्हणून काम करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. त्यांनी तो जरुर करावा, हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा विषय आहे. पण या राज्यात हजारो वर्षांपासून जो समुदाय एकत्र राहतो, त्यांच्यात जो वेगळा भाईचारा आहे, तो संपुष्टात आणण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चित करु नये, असा सल्ला जगताप यांनी दिला आहे.
आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण, प्रवक्ते प्रदीप देशमुख, नगरसेविका नंदा लोणकर, हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, मोहसिन शेख, डॉ.शंतनु जगदाळे, समीर शेख, दिपक कामठे, मेहबूब शेख, हसीना इनामदार यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर
..तर एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ
आलिया आणि रणवीर अडकणार लग्न बंधनात, मुहूर्त ठरला !