Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्रा.डॉ.मेघना भोसले यांना नॅशनल वूमेन्स एक्सलन्स अवॉर्ड

प्रा.डॉ.मेघना भोसले यांना नॅशनल वूमेन्स एक्सलन्स अवॉर्ड

नवी दिल्ली : येथील वुमेन्स पार्लमेंट आणि नॅशनल युथ अवॉर्ड  फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांचे वतीने महिला दिनानिमित्त देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रा.डॉ.मेघना भोसले पुणे यांना महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे स्मृतिचिन्ह, ट्रॉफी मानपत्र देऊन गौरवण्यात आले. श्रीमती रेखा शर्मा, अध्यक्षा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा.डॉ.मेघना भोसले, या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचालित मामासाहेब मोहळ, महाविद्यालय, पौंड रोड, पुणे येथे अर्थ शास्त्र विभाग प्रमुख आहेत. 2017 साली घरेलू महिला कामगारांच्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थात्मक सर्वक्षण मोहीम मध्ये  पुणे शहर, जिल्ह्यातील घरेलू कामगारांच्या समस्या आणि त्यावरील आर्थिक, सामाजिक सबलीकरणावर विशेष प्रबंध लिहिला होता. टिळक महाराष्ट्रविद्यापीठांने त्यांना पी एच डी प्रदान केली आहे.

सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व विठ्ठलराव तुपे जयंतीनिमित्त अभिवादन !

दापोडी : श्रीमती‌ सी.के.गोयल कला वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी !

पिंपरी चिंचवड : आकुर्डीत कवी संमेलन संपन्न


संबंधित लेख

लोकप्रिय