नाशिक : बिरसा क्रांती दलाच्या नाशिक तालुका अध्यक्षपदी पुंडलिक पिंपळके यांची निवड आज (दि.११) बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
बिरसा क्रांती दलाच्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशील युवक जागरूक शिक्षित कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबना स्विकार ही सर्व श्रेष्ठ गोष्ट असते.
पश्चिम आदिवासी भागात हंडाभर पाण्यासाठी आजही भटकंतीच, तेही पिण्याअयोग्य पाणी…
समाज्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी अस्तित्व अस्मिता व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.
यावेळी बिरसा क्रांती दल संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रंगराव काळे, उपाध्यक्ष डी. बी. अंबुरे, राज्य सचिव चिंधू आढळ, उपाध्यक्ष विजय आढारी, राज्य महिला फोरम अध्यक्षा गिरिजा उईके, नाशिक जिल्हा अध्यक्ष एकनाथ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भगवान देशमुख, मधुकर पाडवी, जिल्हा महासचिव किशोर माळी, सचिव बाळू कचरे, दिंडोरी तालुका उपाध्यक्ष शंकर वासले, पुंडलिक वाघेरे, भिमराव चव्हाण, येवला तालुका अध्यक्ष विजय माळी, नांदगाव तालुका अध्यक्ष हिरालाल देशमुख, योगिराज भांगरे, दिंडोरी महिला अध्यक्षा कविताताई भोंडवे, उपाध्यक्ष शैला धुळे इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
डॉ. अशोक ढवळे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोवर निवड
विशेष : पृथ्वीच्या आणि भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी कृतीची गरज, अन्यथा मानवी जीवन…