Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाचे नाव 'आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे...

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाचे नाव ‘आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ असे नामकरण

Bhandardara : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयाचे नाव ‘आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे. जलाशयाच्या नामकरणासाठी अनेक अर्ज शासनाला प्राप्त झाले होते, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, भंडारदरा (Bhandardara) जलाशयाला आता अधिकृतपणे ‘आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ असे नाव देण्यात आले आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संगणक संकेतांक २०२४०९०४१२४१०६८९२७ असा आहे.

Bhandardara

दरम्यान, जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले, जि. अहमदनगर तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार सदर जलाशयास “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

त्यानंतर आज भंडारदरा जलाशयास “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण करण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

संबंधित लेख

लोकप्रिय