Saturday, March 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Pune : एस.एम.जोशी कॉलेजमध्ये सेफ्टी ड्रायव्हिंग उपक्रम संपन्न

Pune / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, क्रीडा विभाग आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सेफ्टी ड्रायव्हिंग या विषयावर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्नेहा पाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. किशोर काकडे उपस्थित होते.

---Advertisement---

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्नेहा पाटील म्हणाल्या की, आजच्या तरुणांनी वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजेत. त्यामुळे अपघातावरती नियंत्रण येऊ शकते. तसेच तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता चांगल्या सवयी लावायला पाहिजेत. तसेच तरुणांनी वाहतुकीचे नियम समजून घेऊन त्याचा स्वतःच्या जीवनात अवलंब केल्यास कुटुंबाचा व समाजाचा विकास होईल. असे मत स्नेहा पाटील यांनी व्यक्त केले.

Pune

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.किशोर काकडे म्हणाले की आजच्या तरुणांनी ड्रायव्हिंग करताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग करत असताना मोबाईलचा वापर करू नये. ड्रायव्हिंग करताना लायसन्स वापरणे आवश्यक आहे. तसेच तरुणांनी कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी करून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नये. असे मत प्राचार्य डॉ. किशोर काकडे यांनी व्यक्त केले.

---Advertisement---

कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.अतुल चौरे, क्रीडा विभागप्रमुख प्रा.दत्ता वासावे, सकाळ समूहाचे शंतनु पोंक्षे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, डॉ.शहाजी करांडे, डॉ.दिनकर मुरकुटे, डॉ.एकनाथ मुंडे, डॉ.संघर्ष गायकवाड, प्रा.महेश देवकर, दीपक गायकवाड आणि बहुसंख्येने प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles