Monday, December 23, 2024
Homeराज्यकर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या, हत्येनंतर दगडफेक आणि जाळपोळ

कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या, हत्येनंतर दगडफेक आणि जाळपोळ

बंगळूर : कर्नाटकातील हिजाबच्या मुद्यावरून तापलेलं वातावरण शांत होत असतानाच कर्नाटकात पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्नाटकातील शिवमोगामध्ये एका २३ वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. हर्ष असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. रविवारी (२० फेब्रुवारी) रात्री आरोपींनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात हर्षा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. 

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

या घटनेनंतर शहरात काही लोकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी जादा बंदोबस्त तैनात करत, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याचबरोबर शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

दरम्यान, हिजाबच्या मुद्द्यावर बजरंग दलही आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यामुळे या हत्येचा हिजाब वादाशी संबंध जोडला जात आहे. मात्र, या प्रकरणाचा हिजाब वादाशी काहीही संबंध नसून हर्ष आणि एका टोळक्याची ओळख होती. पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

स्वप्निल इदे यास ज्यूनिअर रिसर्च फेलोशिप

संबंधित लेख

लोकप्रिय