नवी दिल्ली : पेट्रोल डिझेल च्या दरात आठवड्यात सलग सातव्यांदा वाढ आहे. पेट्रोल 31 तर डिझेल 37 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. रविवारी ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे 53 व 58 पैशांनी वाढ आली होती. मागील पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.85 रुपयांची वाढ झाली आहे.
तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 30 पैसे आणि 35 पैशांनी वाढले. तर दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 31 पैसे आणि 37 पैशांनी वाढले.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. तसे संकेत वर्तवले ही जात होते. ते अंदाज खरे ठरले असून पेट्रोल डिझेल च्या किंमत गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्हिडिओ : तब्बल 600 जवान हवेत झेपावले, भारतीय जवानांचा हा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती