मुंबई येथे पथ विक्रेता निर्धार परिषदेचे आयोजन (Mumbai)
पिंपरी / मुंबई – मुंबईसह महाराष्ट्र राज्यांमध्ये रस्त्यावर विक्री करणारा फेरीवाला हा घटक अत्यंत महत्त्वाचा असू सामान्य माणसांचा सेवक आहे त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्यातील ५० लाख फेरीवाल्याकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे म्हणून सदरच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या २६ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येणार असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर फेरीवाले धडकण्याचा निर्धार आजच्या परिषदेत घेण्यात आला. (Mumbai)
यावेळी कॉ. दिलीप पवार, मॅकंजी डाबरे, कामगार नेते काशिनाथ नखाते, अखिलेश गौड ,प्रशांत सरखोत, प्रफुल्ल म्हात्रे, के नारायणन, विनिता बाळेकुंद्री, शैलेंद्र कांबळे, हुस्ना खान, बबन कांबळे, इरफान चौधरी,राजू बिराजदार, किरण गाडेकर, बालाजी लोखंडे, नितीन सुरवसे, शंकर भंडारी, मनोज यादव ,फरीद शेख, समाधान जावळे, रवींद्र गायकवाड, लाला राठोड, शोभा दोरवे, कृष्णकुमार, अशोक ढगे, रामा बिरादार, बी .गोलंदाज, अंबालाल सुखवाल आदीसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. (Mumbai)
पथ विक्रेता हक्क संघर्ष समिती, नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशनच्या वतीने आज भोईवाडा परळ मुंबई येथे पथ विक्रेता निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डाबरे म्हणाले की फेरीवाल्यांसाठी कायदा असूनही लढावे लागत आहे आपल्यात मोठी ताकद आहे ती दाखवण्याची गरज असून सरकारला त्याचा जाब विचारण्याची हिंमत आपण ठेवावी.
नखाते म्हणाले की देशभरात स्किल इंडिया, ब्राईट इंडिया, व्हिजन इंडिया म्हटले जाते पण हॉकर्स इंडिया कधी म्हटले जाणार आहे .पथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधीची योजना आणली जाते मात्र त्यांच्यावरती कारवाई केली जाते. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा सभागृहात सांगितल्याप्रमाणे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावे अन्यथा महाराष्ट्रातील फेरीवाले वर्षा निवासस्थानावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. विनिता बाळेकुंद्री म्हणाल्या की स्कीम आणि रूल्स बनवण्याचे काम सरकारचे आहे मात्र सरकार टाळाटाळ करत असून याच्या अंमलबजावण्यासाठी आता मुंबई सह महाराष्ट्रातील पथविक्रेते एकत्र आले असून येथे २६ तारखेला राज्यभरात आंदोलन होणार आहे सूत्रसंचालन अनिल कोरे यांनी तर आभार सुग्रीव नरवटे यांनी मानले.