Friday, November 22, 2024
Homeहवामानहवामान विभागाचा नवा अंदाज "या" जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाचा नवा अंदाज “या” जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. परंतु हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यात पुढचे २ दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच, रायगड, रत्नागिरीला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई व नागपूरच्या कार्यालयांद्वारे जारी केला आहे.

हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे की, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच आज १८ ऑगस्टला देखील राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय