Sunday, March 16, 2025

अकोले : ७५ वा स्वातंत्र्य दिन खेतेवाडी गावात मोठ्या उत्साहात साजरा !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

कोतूळ / यशराज कचरे : खेतेवाडी गावात कोरोना सावटामुळे गेली दोन वर्षे स्वातंत्र्य दिन अगदी साधेपणाने साजरा केला जात आहे. परंतु यावर्षी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्था, बिरसा ब्रिगेड, वेताळेश्वर प्रतिष्ठान, अजिंक्यतारा स्पोर्ट्स क्लब व समस्त ग्रामस्त खेतेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

गावातून प्रभातफेरी काढून, शाळेसमोर झेंडावंदन करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. वयोगट ३ ते ६ व प्राथमिक शाळेतील मुलांना शालेपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या, दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन अशा एकूण ११५ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. 

कार्यक्रमा निमित्ताने प्रा.डॉ.सुनिल घनकुटे यांनी आदिवासी संस्कृती उपस्थित बांधवांना सोप्या भाषेत समजावून सांगितली. तसेच अकोले तालुक्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याविषयी छान मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी खेतेवाडी गावातील संतोष दगडू मुठे यांनी लिहिलेल्या “सह्याद्रीतील आदिवासी कोळी महादेव जमातीची लगीन संस्कृती” या पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मुठे होते. सुत्रसंचालन दिलीप गभाले यांनी केले तर आभार प्रदर्शन हरीश्चंद्र गभाले यांनी केले. याप्रसांगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles