Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरबैठकांवर बैठका, मनरेगा अंमलबजावणीबाबत जुन्नर तालुक्यातील प्रशासनाची उदासीनता

बैठकांवर बैठका, मनरेगा अंमलबजावणीबाबत जुन्नर तालुक्यातील प्रशासनाची उदासीनता

२ मार्च पासून आमरण उपोषणाचा इशारा 


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील विविध गावांमधून कामाची मागणी असूनही मजूरांना काम देण्याबाबत जुन्नर तालुका प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे. मजूरांना बेरोजगार भत्ता मिळावा, कामाची मागणी असणाऱ्या गावातील मजूरांना काम उपलब्ध करून द्या आदी मागण्या अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज ( दि.२१ ) मनरेगा कार्यक्रम अधिकारी तथा तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

जुन्नर तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करावी, मागेल त्याला काम मिळावे, मागेल तेव्हा आणि मागेल तितके दिवस काम मिळावे. काम न मिळाल्यास कायदयाने देय बेरोजगार भत्ता मजुरांना मिळावा. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये मजुर प्रधान कामांचा शेल्प तयार करावा. यांसह रोजगार हमी योजनेशी संबंधित इतर अनेक मागण्या घेऊन किसान सभेने वेळोवेळी शांततेच्या लोकशाही मार्गाने आंदोलने, निदर्शने, धरणे, मोर्च्या, घेराव यांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रत्येक वेळी प्रशानाने मागण्या सोडवू मजुरांना काम देण्याबाबत संघटना आणि मजुरांना अश्वासित केलेले होते, असे किसान सभेच्या निवेदनात म्हटले आहे. 

जुन्नर : श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे किल्ले शिवनेरीवर विशेष स्वच्छता अभियान

अद्यापपर्यंत मजुरांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चर्चेशिवाय कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. प्रशासनाशी चर्चा करून मागण्या सुटतील यावर आता मजुर आणि किसान सभेचा विश्वास राहिलेला नाही. यामुळे किसान सभा आता दिनांक २ मार्च २०२२ पासून संघटनेचे पदाधिकारी आणि मजुर असे १० प्रतिनिधी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचेही जोशी म्हणाले.

“कामाची मागणी असलेल्या गावांमध्ये तत्काळ काम सुरू करण्यात येईल. उद्या १२ वाजता तालुक्यातील स्टेट्स डिपार्टमेंट ची बैठक घेण्यात येणार असून प्रशासनाला तत्काळ काम करण्याच्या सुचना देण्यात येईल.”

– रवींद्र सबनीस (तहसीलदार जुन्नर)

“तालुका प्रशासन बैठका घेऊन फक्त आश्वासन देत आहे. प्रत्यक्षात मजूरांना काम दिले जात नाही. त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष काम सुरू करावे. अन्यथा २ मार्च २०२२ पासून संघटना आणि मजूर आमरण उपोषण करणारच.”

– लक्ष्मण जोशी (तालुका सचिव, अ. भा. किसान सभा)

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !


किसान सभेच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

● ग्रामपंचायत चावंड, निमगिरी, खैरे खटकाळे, देवळे, इंगळून, भिवाडे, जळवंडी, आंबे, आंबोली मधील कामाची मागणी केलेल्या मजुरांना काम न दिल्याने कायदयाने देय असलेला बेरोजगार भत्ता तत्काळ वाटप करावा. 

● कामाची मागणी केलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मजुरांना ताबडतोब काम मिळावे. 

● प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मजुरप्रधान कामे शेल्पवर घ्यावीत. 

● मागणी केलेल्या अर्जावर दिनांकित पोच मिळावी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 588 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा

● दिनांकित पोच न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. 

● बांबु लागवडीसाठी सादर प्रस्ताव ताबडतोब मंजूर करावेत. 

● मनरेगा अंतर्गत १०० दिवस अकुशल काम केलेल्या मजुरांचे गायी गोठ्यांचे प्रस्ताव ताबडतोब मंजूर करावेत. 

● रोजगार सेवकांना योग्य मानधन देण्यात यावे. 

निवेदन देतेवेळी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, आंबे पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे, संदिप शेळकंदे उपस्थित होते.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

संबंधित लेख

लोकप्रिय