Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Maval : ठाकरवाडी येथील सौर ऊर्जा प्रकल्पास ई सी ए टीमची भेट, सॉफ्ट सेल ग्लोबल टेक्नॉलॉजी प्रा लि, बिट्वाईज प्रा. लि संयुक्त अभियान

मावळ (क्रांतीकुमार कडुलकर) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे नुकत्याच स्थापित केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पास भेट सदर प्रकल्पाचा उपयोग ठाकरवाडी प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी यांना चांगल्या प्रकारे होत आहे. (Maval)

तसेच शाळेतील विद्यार्थ्यांशी पर्यावरण विषयक संवाद साधून विद्यार्थ्यांवर केले जातात पर्यावरणाचे संस्कार, ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण, कचरा घंटागाडीतच द्या, मोकळ्या जागेत कचरा फेकू नका, कुठलाही कचरा जाळू नका, युज अँड थ्रो चा वापर करू नका, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा सर्व सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरे करा दरवर्षी पाच झाडे लावून ती जगवा प्राणी पक्ष्यांना उपद्रव करू नका अशाप्रकारे जागृती केली जाते.

दुर्गम भागातील शाळांना वीजे अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातात नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यात चार जिल्हा परिषद शाळांना सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आले आहेत. (Maval)

तसेच पुणे जिल्ह्यातील तीन जिल्हा परिषद शाळांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत सदर सौर ऊर्जा प्रकल्प सॉफ्ट सेल ग्लोबल टेक्नॉलॉजी प्रा लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आले आहेत.

सदर शाळांना शैक्षणिक उपक्रमासाठी मोफत लॅपटॉप वाटप करण्यात आले आहेत ग्रामीण भागातील मुले ई साक्षर होण्याबरोबरच पर्यावरण साक्षर होण्यासाठी सॉफ्ट सेल ग्लोबल टेक्नॉलॉजी प्रा लिमिटेड आणि TEAM ECA चा उपक्रम राबवला जात आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी आढावा भेट घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प आणि पर्यावरण विषयक अडीअडचणीच्या संबंधात शाळा प्रशासनाशी चर्चा केली, भविष्यात येथील सर्व विद्यार्थी आणि ग्रामीण भाग पर्यावरण पूरक ठेवण्यासाठी कंपनी व्यवस्थापन मदत करणार आहे.

सदर उपक्रम संस्थेच्या अध्यक्षा विनिता दाते यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, संस्थेचे सदस्य श्री सिकंदर घोडके यांनी पर्यावरण विषयक मुलांना मार्गदर्शन केले, मुलांकडून पालकांना संदेश पाठवला जातो प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रुपेश महाडिक अंगणवाडी सेविका व ECA ( ENVIRONMENT CONSERVATION ASSOCIATION) च्या टीम कडून राबवले जातात. ईसीए सदस्य तानाजी भोसले या प्रसंगी उपस्थित होते.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ग्राहकांसाठी खूशखबर : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल, 40-70% पर्यंत सूट

---Advertisement---

महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी

पुण्यात विद्यार्थ्यांची फ्रीस्टाईल हाणामारी, कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

सुंदर स्टेटस ठेवला अन् काही वेळातच भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

‘सारथी’मार्फत तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार विद्यावेतन मिळणार

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles