तांदुळवाडी क्रांतिवीर रत्नदीप : बारामती येथील धम्म ज्योती बुद्ध विहार तांदुळवाडी येथे माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामूहिक त्रिसरण पंचशील आणि बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर सामुदायिक खीर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास तेजस सरोदे ,दर्शन सरोदे ऋषिकेश सरोदे, बबलू शिंदे, हर्ष सरोदे, सुनील पानसरे ,साहिल सरोदे ,करण पानसरे, बंटी सरोदे ,गौतम सरोदे ,रोहन जगताप आणि इतर बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.