पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : शिवतेज नगर, चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये काल सामूहिक तुळशी विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी परिसरातील 15 कुटुंबीयांच्या तुळशी विवाह साठी आलेल्या होत्या. दरवर्षी हा विवाह सोहळा मंदिरामध्ये पार पडतो. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पूजेचे सर्व साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले होते. विजय निर्मल गुरुजी यांनी भगवान श्रीकृष्ण आणि तुळशी माता चे विधिवत पूजन करून मंत्रविचाराचा घोष करून मंगलाष्टक म्हटली. शेवटी टाळ्या व फटाके फोडून हा विवाह संपन्न झाला. परिसर छानश्या रांगोळ्या काढल्या होत्या.
सदर विवाह सोहळा यशस्वी संपन्न होण्यासाठी प्रा. हरीनारायण नारायण शेळके, अंजली देव, सारिका रिकामे, शोभा नलगे, क्षमा काळे, मंगल काळे, नंदू शिरसाठ, जगन्नाथ पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले. शेवटी तुळशी मातेची आरती म्हणून बुंदीचे वाटप प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. सदर विवाह सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.



