पालघर : १ एप्रिल २०२२ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPIM) व किसान सभेचे (AIKS) लढाऊ व निष्ठावंत नेते कॉ. बारक्या मांगात यांना तलासरीत हजारो लोकांनी अखेरचा भावपूर्ण निरोप दिला. त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी तलासरीतील संपूर्ण बाजारपेठ व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवली होती आणि तलासरीतील शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.
कॉ. बारक्या मांगात यांचे लाल झेंड्यातील पार्थिव आज सकाळी कॉ. गोदावरी शामराव परुळेकर भवन या माकपच्या जिल्हा कमिटीच्या कार्यालयात ठेवण्यात आले. ठाणे-पालघर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील हजारों लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
व्हिडिओ : अतिरिक्त ऊस व एफ.आर.पी. प्रश्नी किसान सभेची साखर आयुक्तांची बैठक
लाल झेंड्यांनी सजवलेल्या टेम्पोमधून त्यांना लाल सलाम देणाऱ्या घोषणांच्या निनादात त्यांची अंत्ययात्रा निघाली. आमगाव या त्यांच्या गावातील स्मशानभूमीत त्यांचे पुत्र हरेश यांनी त्यांना अग्नी दिला.
त्यापूर्वी पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी कॉ. बारक्या मांगात यांना संक्षिप्त आदरांजली वाहिली.
भारतीय सैन्य (Indian Army) NCC मध्ये भरती, आजच अर्ज करा !
ब्रेकींग : स्वयंपाकाच्या गॅस (LPG) दरात प्रचंड वाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर गॅस दरवाढीचा भडका
माकपचे ज्येष्ठ नेते एल. बी. धनगर व माजी खासदारम लहानू कोम आणि हेमलता कोम, केंद्रीय कमिटी सदस्य माजी आमदार जे. पी. गावीत व मरियम ढवळे, राज्य सेक्रेटरी डॉ. उदय नारकर, राज्य सचिवमंडळ सदस्य किसन गुजर व डॉ. एस. के. रेगे (मुंबई जिल्हा सचिव), आमदार विनोद निकोले, किरण गहला (ठाणे-पालघर जिल्हा सचिव), सुभाष चौधरी, भिका राठोड (नाशिक जिल्हा सचिव), आरमायटी इराणी, लक्ष्मण डोंबरे, रडका कलांगडा, लहानी दौडा, भरत वळंबा, प्राची हातिवलेकर आणि के. आर. रघु, सीटूचे राज्य सचिव पी. एम. वर्तक,
किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष सावळीराम पवार, पक्षाचे तालुका सचिव यशवंत घाटाळ, चंदू धांगडा, सुनील सुर्वे, पी. के. लाली, पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती रामू पागी, तलासरी पंचायत समितीचे सभापती नंदू हाडळ व उपसभापती राजेश खरपडे, तलासरीचे नगराध्यक्ष सुरेश भोये व उपनगराध्यक्ष सुभाष दुमाडा, कॉलेजचे प्राचार्य बी. ए. राजपुत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोबो व मधू धोडी आदींसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.