ग्वाल्हेर : मणिपूरमध्ये हिंसक जमावानेन दोन महिलांची नग्न अवस्थेत भर रस्त्यात धिंड काढल्याचा घटनेचा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील जाहीर सभेत कठोर शब्दात निषेध केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी (19 जुलै) मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या, “मणिपूरमध्ये शांततेसाठी प्रयत्न सुरू असताना आपण सर्वांनी एका आवाजात हिंसाचाराचा निषेध केला पाहिजे. मणिपूरमधील हिंसक घटनांकडे केंद्र सरकार, पंतप्रधान का डोळेझाक करत आहेत?
मणिपूरमधील एका समुदायातील महिलांची खुलेआम परेड करण्याच्या घटनेबाबत ते म्हणाले की, ‘गेल्या 2 महिन्यांपासून मणिपूर जळत आहे. घरे पेटवली जात आहेत. महिलांवर भयंकर अत्याचार होत आहेत. पण पंतप्रधान मोदींनी 77 दिवस याबद्दल एक शब्दही उच्चारला नाही. महिलांसोबत घडणाऱ्या अमानुष घटनांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बळजबरीने एक वाक्य उच्चारले आणि त्यातही राजकारण केले आहे, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव
PCMC : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा शिंदे गटात प्रवेश
ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून