पुणे : पहाटेपासून पुणे जिल्ह्यातील विद्युतपुरवठा खंडीत झाला आहे. यंत्रणेतील बिघाडामुळे हा वीजपुरवठा अचानक खंडित झाला आहे, त्याचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरु होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये पाच ठिकाणी बुधवारी पहाटे 4 वा बिघाड झाल्यामुळे औद्योगिक वसाहती, पुणे, पिंपरी चिंचवड सह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था कोसळली आहे.
वाईन नव्हे महाराष्ट्राची प्राथमिकता हवी दूध – दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती
पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी 4 वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.
वीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात हडपसर, कोंढवा, कात्रज, धायरी, स्वारगेट, बाणेर, कोथरूड शिवाजीनगर रस्ता रोड, फाटा रोड, आजचा भाग वडगाव शेरी, चंदन नगर, टिंगरे नगर, येरवडा, पिंपरी- चिंचवड येथील ऑफिसला जाणार्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
हडपसर उड्डाणपूल तातडीने बंद केला
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती