Sunday, December 22, 2024
Homeजिल्हामहात्मा फुले यांचे कार्य आजही दिशादर्शक - श्रीमती अर्चना कोल्‍हे यांचे प्रतिपादन...

महात्मा फुले यांचे कार्य आजही दिशादर्शक – श्रीमती अर्चना कोल्‍हे यांचे प्रतिपादन !

घोडेगाव : महात्मा फुले यांचे कार्य आजही समाजासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती अर्चना कोल्‍हे यांनी केले.

महात्मा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त, आदिम संस्कृती, अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र,या संस्थेच्या माध्यमातून घोडेगाव, येथे महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती कोल्हे बोलत होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला.

घाटघर येथे रात्री भरला रोजगार मेळावा

पुढे बोलताना कोल्हे म्हणाल्या, “महात्मा फुले यांचे कार्य, विशेषता: महिलांसाठी, बहुजनांसाठी त्यांनी केलेले कार्य व त्याग, त्यासाठी सहन केलेला समाजाचा रोष हे सामाजिक बदलात मौलाचे ठरले. याचबरोबर यापुढील काळातही, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या कार्यक्रमाला किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष राजु घोडे, शंकर काठे, अशोक जोशी, डॉ.अमोल वाघमारे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, अंकिता सैद, प्रास्ताविक शंकर काठे व आभार प्रदर्शन नंदन लोंढे यांनी मानले. 

पुणे : जुन्नर मध्ये हंडाभर पाण्यासाठी आजही भटकंतीच, तेही पिण्याअयोग्य पाणी…

या कार्यक्रमाचे संयोजन दिव्या जाधव, नंदन लोंढे, दुर्गा गुप्ता, रचना अकोलकर, वैष्णवी सहाणे, अंकिता सैद, तेजल विरणक यांनी केले होते.


संबंधित लेख

लोकप्रिय