Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएक सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावला - मानव कांबळे

एक सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावला – मानव कांबळे

पिंपरी चिंचवड : भाजपाने तीन दिवसांपूर्वीच सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावून घेणे, 16 आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांनी 24 तासात फ्लोअर टेस्ट घेण्याचा आदेश काढणे, मुंबईमध्ये सीआरपीएफचे 2000 जवान तैनात करणे, बंडखोरांना चार्टर विमानाने गुहाटी वरून गोव्याला घेऊन जाणे, हे सर्व पूर्वनियोजित आणि केंद्र सरकार पुरस्कृत कारस्थान होते हे सिद्ध करायला पुरेसे आहे, असे मत नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले, मागील 31 महिन्यात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा कारभार अतिशय संयमाने चालवला. कोरोना काळामध्ये त्यांनी केलेले काम हे नक्कीच कौतुकास्पद होते. स्वतःच्याच पक्षातील आमदारांनी बंड केल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता, अतिशय संयमाने आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. हे लोकशाही संकेतांना बळ देणारे असून, या राज्याने खूप वर्षांनंतर असा एक सुसंस्कृत लोकशाहीवादी व सुसंस्कृत मुख्यमंत्री अनुभवला हे मान्य करावे लागेल. महाराष्ट्राला लाभलेला एक सुसंस्कृत संयमित आणि संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात त्यांची स्थान कायम राहील, असेही मानव कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय