Thursday, March 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : 'डॉक्टर डे' दिनानिमित्त डॉक्टरांचा केला सन्मान

पिंपरी चिंचवड : ‘डॉक्टर डे’ दिनानिमित्त डॉक्टरांचा केला सन्मान

पिंपरी चिंचवड : ‘डॉक्टर्स डे’ दिनानिमित्त चिखली येथील रेम्बो हॉस्पिटलमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली “डॉक्टर्स डे” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉक्टरांचा सन्मान व त्यांना भेटवस्तू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस दीपक गुप्ता यांच्या वतीने देण्यात आले.

यावेळी डॉ.पंडित दराडे, डॉ. सायली कांबळे, डॉ.वैष्णवी शिंदे, सुनीता दांगट, हिना पगारवार, कोमल झोडगे, राजश्री झेंडे, सागर चंदने तसेच राष्ट्रवादीचे युवक ओमकार नागतिलक, अनिकेत जाधव, जुनेद खान, मुस्ताक खान आदी उपस्थित होते.

दैनंदिन जीवनात मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून अनेक सल्ले दिले जातात, कोरोना महामारीच्या काळात तर डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच ठरले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि प्रतिकार परिस्थितीत देखील डॉक्टर आपल्या रुग्णाचा जीव कसा वाचवण्याचा प्रयत्न करतात हे सर्वांनी पाहिले. प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरवतो याची खात्री करतो.

या कार्यक्रमा वेळी डॉ. पंडित दराडे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हा जो कार्यक्रम घेतला आहे तो सन्मानाचा आहे. आणि तो आम्ही आनंदाने स्वीकारत आहे असे म्हणत यापुढे युवकांना आमच्याकडून काही मदत लागली तर आम्ही तत्पर्य आहोत, असेही ते म्हणाले.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

 


लोकप्रिय