पुणे / प्रतिनिधी : दि.१८– पुण्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. आधीच उकाड्याने नागरिक त्रस्त त्यात सायंकाळी वीजपुरवठा बंद त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. सायंकाळी 7 वा आकुर्डी, चिंचवड, पुणे, पिंपरी, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव, चाकण एमआयडीसी, नगर रस्ता, भोसरी आणि वाघोली सह विविध उपनगरात वीजपुरवठा अचानक खंडीत झाल्यामुळे नागरिक हैराण झाले.
अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाला.देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
पुणे , पिंपरी चिंचवड मध्ये ३ लाख घरांची बत्ती गुल .
- Advertisement -