Friday, March 29, 2024
Homeआंतरराष्ट्रीयइटलीत महापूर ,१३ ठार ; देशात आणीबाणी जाहीर.

इटलीत महापूर ,१३ ठार ; देशात आणीबाणी जाहीर.

इटली / प्रतिनिधी : नैसर्गिक आपत्ती पुढे माणसाचे काहीच चालत नाही. ग्लोबल वार्मिंग मुळे ऋतुचक्र बदलले आहे. इटलीमध्ये मुसळधार पावसामुळे २२ नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. वर्षभरातील १००० मिमी पडणारा पाऊस बुधवारपासून ३६ तासात ५०० मिमी पडला. भुसखसलन होऊन देशातील प्रमुख शहरातील रस्त्यावर चिखल गाळयुक्त महापुराचे पाणी शिरले.



उत्तर इटलीतील एमिलिया-रोमाग्ना भागात सर्वत्र पुराचे पाणी शिरले. इटलीच्या आपत्कालीन विभागाने १३ लोक मृत्युमुखी झाल्याची माहिती दिली आहे. एकूण ५० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सरकारने आणीबाणी जाहीर करून ठप्प झालेला विद्युत व शुद्ध पाणी पुरवठा यंत्रणा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय