Wednesday, February 12, 2025

“माझा शर्ट सोड, नाहीतर आई ओरडेल!” – वाघाच्या जबड्यात शर्ट अडकलेल्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल

leopard viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका लहान मुलाचा टी-शर्ट वाघाच्या जबड्यात अडकला आहे आणि तो मुलाला खेचत आहे. ही घटना एका प्राणीसंग्रहालयातील असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, मुलाचा टी-शर्ट वाघाने जबड्यात धरला आहे आणि तो शर्ट जोरात ओढत आहे. यावर मुलगा जोरजोरात ओरडतो आहे मदत मागत आहे. यासोबतच पुढे तो वाघाला म्हणतो, “माझा शर्ट सोड, नाहीतर माझी आई मला ओरडेल!”. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

माझा शर्ट सोड, नाहीतर… (leopard viral Video)

आपला शर्ट वाघाच्या तोंडात आहे. जीव मुठीत असताना हा लहान मुलगा वाघाला न घाबरता आपल्या आईच्या रागाची अधिक भीती वाटत आहे. माझा शर्ट सोड नाहीतर माझी आई ओरडलं, असं त्या वाघाला सांगत आहे. या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. व्हिडिओ शेअर केलेल्या युजर्सने व्हिडिओवर लिहले आहे की, ‘मम्मी से डर लगता है शेर से नही’

या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “मुलांचे निरागस विचार किती मजेशीर असतात! वाघाने पकडले तरी पहिला विचार आईच्या माराचा!” तर काहींनी या घटनेवर संतापही व्यक्त केला आहे. “या मुलावर वाघाने हल्ला केला असताना लोक मदतीऐवजी फक्त व्हिडीओ शूट करत होते, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे,” असेही काहींनी म्हटले आहे.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, तो वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे आणि चर्चेचा विषय ठरत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्या आणि दुचाकीस्वाराची जोरदार धडक, पुढे काय झाले पहा !

प्रेमात अडथळा ठरत असल्याने आईसमोर ५ वर्षांच्या चिमुरड्याचा खून, मृतदेह फेकला नदीत

CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न ; आर्थिक इतिहास पाहुन वधूपक्षाला धक्का !

अंगणवाडीत विविध पदांसाठी भरती ; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

वाल्मीक कराडच्या बातम्या पाहिल्याने तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

झोमॅटो कंपनीचे नाव बदलले, आता असेल ‘हे’ नाव

Related Articles

- Advertisement -

Latest Articles