बीड : धारूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ वाल्मिक कराड (Walmik Karad News) आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलवर पाहिल्या म्हणून अशोक मोहिते या तरुणाला लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली. ही अमानुष घटना केज शहरातील चौकात घडली असून, हल्ल्यात अशोक मोहिते गंभीर जखमी झाला आहे.
अशोक मोहिते आपल्या मोबाईलवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या यांच्या संदर्भातल्या बातम्या बघत होता. त्यावेळी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी अशोक मोहिते वाल्मिक कराड यांच्या का पाहतो, म्हणत बेदम मारहाण केली. अशोक मोहिते यांच्यावर सध्या लातूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोर कर्नाटकमधून अटकेत
या प्रकरणात वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोन आरोपींना कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आले आहे. धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दोघांवर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी
आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे समोर आले आहे. 9 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात खंडणी, दहशत आणि टोळ्यांचे राजकारण चर्चेत आले होते.
Walmik Karad च्या बातम्या पाहिल्याने बेदम मारहाण
पीडित अशोक मोहितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “आरोपींनी लोखंडी पाईप आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. संतोष देशमुख प्रकरणाच्या बातम्या पाहिल्यास परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी दिली गेली होती. हल्ल्यात मोहितेच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन मेंदूवर सूज आली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याला शुद्धीवर येण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील.


हे ही वाचा :
धक्कादायक : ब्लूटूथच्या स्फोटामुळे १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा
इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची मोठी भरती, असा करा अर्ज