Photo : Facebook |
लातूर : अमरावतीच्या सावंगी मग्रापूर गावातील दलित वस्तीचा पाणी पुरवठा बंद केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आणखी एक पुरोगामी महाराष्ट्राला कलंकीत करणारी घटना घडली आहे.
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात एका दलित तरूणाने मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतलं आणि नारळ फोडला म्हणून दलित समाजावर बहिष्कार घालण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी दलितांनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ नये असा नियम. हा नियम मोडल्यानं गावकऱ्यांनी दलित समाजावर बहिष्कार टाकला. या कुटुंबासोबतचे किराणा देणं, शेतातील मजूरी असे सर्व व्यवहार बंद केले आहेत. असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! परिक्षेच्या सरावासाठी मिळणार Question Bank !
घरकुलच्या प्रतिक्षेत असलेल्या ‘ड’ यादी धारकांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेपर्यंत मिळणार १०० टक्के मंजूरी
गावातील कोणी बहिष्काराचा नियम मोडला तर त्यालाही तब्बल 50 हजारांचा दंड लावला जाणार होता. हे संपूर्ण प्रकरण पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून बहिष्कार मागे घ्यायला लावला.
पुरोगामी राज्य आहे तरीसुद्धा अशा घटना वाढताना दिसत आहे त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करून अशा समाजकंटाकावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करावी.@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @zee24taasnews @News18lokmat @lokmat @LoksattaLive @mataonline @Dainik_Prabhat pic.twitter.com/ZkoxAeSOxU
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) February 5, 2022
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती
या प्रकरणावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मागणी केली आहे कि, लातूर जिल्ह्यातील ताडमुगळी गावात मंदिरात जाण्यावरून दलित बांधवांना वाळीत टाकून त्यांना कोणी मदत करेल त्याला 50 हजार रुपये दंड असल्याचे सोशल मीडियात असा व्हिडीओ दिसत आहे. हे अत्यंत निषेधार्थ आहे. महाराष्ट्र राज्य हे राज्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे तरी सुद्धा अशा घटना वाढताना दिसत आहे, त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करून अशा समाजकंटाकावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करावी, अशी मागणी केली आहे.