Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नाशिक मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या अळ्या !

नाशिक : नाशिकच्या चांदवड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या (Larvae) आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात (Hostel) राज्यातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण (Meal)ही व्यवस्थित मिळत नाही. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या भाजीत चक्क अळ्या आढळल्याची खळबळ घटना घडली आहे. वारंवार तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

बुधावरी जेवणामध्ये सोयाबीनची भाजी आणि रोटी बनविण्यात आली होती. या भाजीत विद्यार्थ्यांना अळ्या आढळल्या. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी वसतिगृह अधीक्षकांना पत्र लिहून सर्व माहिती दिली.

सध्या वसतिगृहात 40 विद्यार्थी राहतात


सद्यस्थितीत 40 विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. त्यांच्या भागात सोयी सुविधा नसल्याने चांदवडमध्ये राहून हे विद्यार्थी शिक्षण घेतात. अळ्यांबाबत विद्यार्थ्यांनी ठेकेदाराच्या माणसांना जाब विचारला. मात्र ठेकेदाराकडून याउलट विद्यार्थ्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

वसतिगृहात सुविधांची वाणवा

या वसतिगृहात सोयी-सुविधांचीही मोठी वानवा आहे. वसतिगृहातील खिडक्या, दरवाजे, गाद्या, चादरी अतिशय खराब आहेत. बाथरुममध्ये पाणी नाही. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवणही नित्कृष्ट दर्जाचे असते. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येतेय.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles