Friday, April 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर तालुक्यातील खामगावात विद्यार्थ्यांना छत्री वाटप

जुन्नर तालुक्यातील खामगावात विद्यार्थ्यांना छत्री वाटप

जुन्नर : खामगांव येथील न्यु इंग्लिश स्कुल, खामगांव येथे आदिवासी व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या १०० विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था, नारायणगांव यांच्या वतीने छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

विघ्नहर दलित सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष व वसंतराव पाटील ना.सह.पतसंस्थेचे संस्थापक, संस्थेचे मार्गदर्शक गणपत फुलवडे यांच्या विशेष प्रयत्नांतून प्राप्त झालेल्या छत्री वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संग्राम फुलवडे होते.

या कार्यक्रमाला पतसंस्थेचे संचालक विलास वाजगे, एकनाथ शेटे, सचिव सुनिल भुजबळ, अशोक पाटे, डाॅ.पंकज जाधव, व्यवस्थापक सचिन तोडकरी व खामगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजिंक्य किरण घोलप उपस्थित होते.

विद्यालयाचे मुख्याध्यापक घनशाम गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षक सावळेराम गवते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक विनायक खोत, सावळेराम गवते, आत्माराम घोलप आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय