कानपूर : इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना विजेचा धक्का लागून एका मजुराचा मृत्यू दुःखद घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
---Advertisement---
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये बांधकाम सुरू असताना एका मजुराचा विजेच्या तारेचा धक्का लागल्याची धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे.
मुळात कोणत्याही बांधकामाचे जागी मजुरांची सुरक्षा अतिशय आवश्यक आहे, मात्र बेकायदेशीर बांधकामे करत असताना अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत असतात.
कामाच्या ठिकाणी पुरेश्या सुरक्षा संबंधी उपाययोजना करण्यात येत नाहीत. त्याचा त्रास मजुरांना होत असतो. यात चूक कोणाची ते पाहून योग्य ती भरपाई देण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.