Wednesday, June 26, 2024
Homeराष्ट्रीयतरूणीने केले स्वत: शी लग्न, सोशल मीडियावर तुफान चर्चा

तरूणीने केले स्वत: शी लग्न, सोशल मीडियावर तुफान चर्चा

वडोदरा : गुजरात मधील क्षमा बिंदूने अखेर बुधवारी स्वतःशी लग्न केले आहे. काही दिवसांपुर्वीच तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. क्षमाच्या निर्णयामुळे देशभरात जोरदार चर्चा झाली. या विवाहासाठी मोठा विरोधही होत होता, मात्र या प्रचंड विरोधानंतरही २४ वर्षांच्या क्षमाने अखेर स्वत: शी केले आहे. 

क्षमा बिंदूने 11 जून रोजी स्वतःशी लग्न करण्याची घोषणा केली होती, मात्र देशभरातून आणि शेजाऱ्यांचा होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तिने ठरलेल्या तारखेच्या 3 दिवस आधीच लग्न केले आहे. तिने लग्नाची घोषणा केल्यापासून त्यांच्या घरी सतत लोकांची वर्दळ होती. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचे सांगण्यात येत आहे. या विवाहाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

गुजरात मधील क्षमा बिंदूने केले स्वत: शी लग्न, लग्नाचे फोटो पाहिलेत का ?

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

क्षमा बिंदूने मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राजकीय नेत्याच्या विरोधानंतर त्यांनी घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्षमाने वडोदराच्या गोत्री येथील घरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. लग्न लावणाऱ्या पंडितानेही या स्व-विवाहाचा विधी करण्यास नकार दिला. यानंतर क्षमाने टेपवर मंत्र वाजवून लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नादरम्यान हळदी-कुंकवाचे विधी झाले, मेहेंदी सेरेमनीदेखील झाली. त्यावेळी क्षमाने स्वतःशी लग्नगाठ बांधली. या लग्नासाठी क्षमाने कुटुंबातील जवळच्या आणि काही खास मित्रांना निमंत्रण दिले होते.

असा निर्णय का घेतला? 

एका खासगी कंपनीत नोकरी करते. क्षमाला लग्न करण्याची कधीच इच्छा नव्हती, परंतू वधू बनण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सामान्यपणे लोक प्रेम असलेल्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे, म्हणून मी स्वतःशीच लग्न केले, असे क्षमा म्हणाली. क्षमाचे आई-वडील खुल्या विचारांचे आहेत, त्यामुळे त्यांनीही तिच्या या निर्णयास पाठिंबा देत लग्नात क्षमाला आशीर्वाद दिला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय