कोल्हापूर : पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर युवक जिल्हाध्यक्षपदी मुसा मुल्ला यांची निवड करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे उपस्थितीत राज्य संघटक अमोल महापुरे यांच्या हस्ते कोल्हापूर येथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत निवडीचे पत्र देण्यात आले.
या बैठकीस राज्य सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, कोल्हापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्ष संभाजी चौगुले, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल सोनावळे, पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुख श्रीमती शोभा पारधे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल चौगुले, शाहुवाडी तालुका अध्यक्षा रेणुका सोनावळे,
कोल्हापूर जिल्हा युवक संपर्कप्रमुख दीपक शिंगे, बँड बँजो व इतर कलावंत आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय सावंत, पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती सौंदडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा राधा कांबळे, कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षा पार्वती अडसुळे, कोल्हापूर शहराध्यक्ष दिलीप कांबळे इत्यादी कोल्हापूर जिल्ह्यातील पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी आभार अनिकेत चौगुले यांनी मानले.
बेरोजगारी विरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाची निदर्शने
‘बाप बेटे जेलमध्ये जाणार, कोठडीचे sanitization सुरू’ संजय राऊत यांच्या ट्विटमुळे खळबळ
पंजाबी अभिनेता आणि लाल किल्ल्यावरील आंदोलनातील मुख्य आरोपी दीप सिध्दूचा अपघाती मृत्यू