Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Kokan rail : गणपती स्पेशल ट्रेन बुकिंग फुल्ल, विशेष गाड्या सोडणार

चिपळूण : कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात, दरवर्षी प्रमाणे या वर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. (Kokan rail)

मात्र या गणपती स्पेशल गाड्यांचे अवघ्या काही मिनिटातच बुकिंग फूल झाल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या पाच मिनिटात २५८ गणपती स्पेशल ट्रेनचे बुकिंग फुल झाले असून वेटिंग लिस्ट ७०० ते ८०० च्या घरात गेली आहे.

मुंबई सेंट्रल ते कुडाळ साप्ताहिक विशेष, अहमदाबाद ते कुडाळ साप्ताहिक विशेष, विश्वामित्री ते कुडाळ साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन, अहमदाबाद ते मंगळूरु साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन या गाड्यांचा समावेश आहे. याआधी कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहयोगाने सात विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोकणातील गणेश भक्तांसाठी पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या रेल्वे सोडणार आहे. उन्हाळी व पावसाळ्यातील विशेष गाड्यांनंतर आता पश्चिम रेल्वेने गणपती उत्सवासाठी देखील विशेष गाड्या सोडण्याची कोकण रेल्वेने घोषणा केली असल्याने या मुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

याच बरोबर आता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने वेगवेगळ्या सहा मार्गांवर गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. करमान्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. (Kokan rail)

या विशेष गाड्या २ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यत वेगवेगळ्या तारखांना मुंबईतून सोडल्या जातील. मात्र या गाड्या अपुऱ्या पडू शकतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे, यावर्षी पावसाळा खूप छान झाल्यामुळे कोकणी माणूस मोठ्या उत्साहाने या रेल्वे गाड्यांनी कोकणात दाखल होणार आहे.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

---Advertisement---

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles