Monday, December 23, 2024
Homeआरोग्य'या' राज्याने केला घरच्या घरी मोफत उपचार देणाऱ्या डायलिसिस योजनेचा शुभारंभ

‘या’ राज्याने केला घरच्या घरी मोफत उपचार देणाऱ्या डायलिसिस योजनेचा शुभारंभ

Photo :Pixabay

तिरुअनंतपुरम : केरळ राज्य देशातील अग्रेसर राज्य असून शिक्षण, आरोग्याची धोरणे देशासाठी दिशादर्शक आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डावी लोकशाही आघाडीचे सरकार जनतेच्या सर्वांगिण योजना, धोरण आखत आहे. नुकतेच केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज (Veena George) यांनी पेरीटोनियल डायलिसिस योजनेचा (peritoneal dialysis scheme) शुभारंभ केला. अशी घरपोच मोफत आरोग्य सुविधा देणारे ते देशातील पहिले राज्य ठरले आहे.

सुरूवातीला ११ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर घरच्या घरी मोफत पेरीटोनियल डायलिसिस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिथे रूग्णांना हॉस्पिटलमध्ये न जाता घरपोच मोफत डायलिसिस करता येईल. पेरिटोनियल डायलिसिस ही शरीरातील रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे.

ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांचा मोठा भाऊ आणि 17 एलजेडी नेत्यांचा कम्युनिस्ट पक्षात प्रवेश

विशेष लेख : गुलाबी 7 दिवसांतल्या भोवऱ्यात डुबकी घेण्यापूर्वी… – विशाल आडे

डायलिसिस म्हणजे मशिनद्वारे किडनीचे काम करून रक्तशुद्धी करणे. या योजनेचे उद्दिष्ट हिमोडायलिसिस कमी करणे हे आहे. जे केवळ रुग्णालयात केले जाऊ शकते आणि खूप महाग आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. सध्या, ही सुविधा तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे. उर्वरीत 3 जिल्ह्यांमध्ये लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

नवीन योजनेमुळे रुग्णांना हेमोडायलिसिससाठी रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल, जी महाग आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे.

10 वी व 12 साठी सुवर्णसंधीचा लाभ घ्या! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या १७७ जागा

शरीरातील रक्त शुद्ध करण्याची ही एक पद्धत आहे. हे अतिरिक्त द्रव काढून टाकते, इलेक्ट्रोलाइट समस्या सुधारते आणि मूत्रपिंड निकामी करणारे टॉक्सीन (toxins) काढून टाकते.

संबंधित लेख

लोकप्रिय