मुंबई : कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब बंदीच्या वादावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गंभीर आरोप केला आहे. राज्यकर्ता पक्षच तेथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले.
तसेच हिजाबच्या नावे मुस्लिम विद्यार्थिनींवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक शासनाचा तीव्र शब्दांत माकपने निषेध केला आहे. “महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करू पाहणाऱ्या मनुवाद्यांचा महाराष्ट्र शासनाने बंदोबस्त करण्याची मागणीही माकपने केली आहे.
संजय राऊतांच्या पत्राने राजकीय वर्तुळात भुकंप, केले गंभीर आरोप
मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घेऊन वर्गात बसणे हा त्यांचा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक अधिकार आहे. भाजपशासित कर्नाटक राज्यात समाजात धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी विद्यार्थिनींवर हिजाबबंदी घातली जात आहे. विविध समाजात वेगवेगळ्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आहेत. ते समाज सार्वजनिक जीवनात त्यांचे पालन करत असतात. त्यामुळे दुसऱ्या परंपरा मानणाऱ्यांवर कसलाही अन्याय होत नाही. मुस्लिमांना आधुनिक शिक्षणव्यस्थेतून बहिष्कृत करून रास्व संघ आणि भाजप मनुवादी विचारसरणीचा अवलंब करत मुस्लिमांना नवे अस्पृश्य बनवू पहात आहेत. हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. मुस्लिम विद्यार्थिनींनी डोक्यावर हिजाब घेतल्याने वा शीख विद्यार्थ्यांनी डोक्यावर त्यांची पगडी घातल्याने शिक्षणात व्यत्यय येत नाही. त्यामुळे ठरवलेल्या मुख्य गणवेशाला बाधा येत नाही. एखाद्या विद्यार्थ्यास शेंडी ठेवून अथवा विद्यार्थिनीस कपाळावर कुंकू लावून वर्गात जायचे असेल तरी त्याला कुणाचा आक्षेप असायचे कारण नाही. तोच न्याय हिजाबबाबत लावला पाहिजे, असेही म्हटले आहे.
कर्नाटकात पुरूष विद्यार्थ्यांना मुस्लिम विद्यार्थिनींच्या विरुद्ध हिंसक चिथावणी दिली जात आहे. मुस्लिम मुलींना संरक्षण देऊ न शकणाऱ्या कर्नाटकच्या भाजप शासनाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निषेध केला आहे. तसेच राज्यकर्ता पक्षच तेथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे, ही चिंतेची बाब आहे, असेही म्हटले आहे.
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
कर्नाटक सारखच प्रयत्न भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी राजकीय पक्ष महाराष्ट्रात करू पाहात आहेत. महाराष्ट्र शासनाने मुस्लिम विद्यार्थिनींचा हिजाबसारख्या प्रकरणावरून सामाजिक छळ होणार नाही, येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची हमी घेतली पाहिजे, अशी मागणि माकपने केली आहे.
हिजाब घेणाऱ्या फातिमा शेख यांच्या साह्याने डोक्यावर पदर घेतलेल्या सावित्रीबाई फुल्यांनी महाराष्ट्रात सर्व जातीधर्मांच्या मुलींच्या शिक्षणाचा पाया घातला. या परंपरेला चूड लावू पाहणाऱ्या समाजविघातक मनुवादी प्रवृत्तींचा महाराष्ट्र शासनाने कडक बंदोबस्त करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत असल्याचे नरसय्या आडम म्हणाले.
दूध उत्पादकांसाठी आरपारचा लढा करण्याचा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा इशारा
तसेच लॉकडाऊमुळे गोरगरिबांच्या शिक्षणात विघ्न आले, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचाराच्या कुणा तथाकथित ’हिंदुस्तानी भावाने’ विद्यार्थ्यांना चिथावण्याचा प्रयत्न करून बहुजनवर्गातील विद्यार्थ्यांची दिशाभूल केली. महाराष्ट्रातील तरूणांची मने दूषित करणाऱ्यांच्या कारवाया शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, महर्षि वि. रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही, असा गंभीर आरोप करत इशारा दिला आहे.