Rahul Gandhi and Kareena Kapoor Khan : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अलीकडेच तिची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये तिने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही मुलाखत सिमी गरेवाल यांच्या लोकप्रिय चॅट शोमधील आहे, जिथे करीना तिच्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करते. या मुलाखतीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि सोशल मीडियावर यावरून चर्चांना उधाण आले आहे.
मुलाखतीत काय म्हणाली करीना कपूर ? | Rahul Gandhi
या जुन्या मुलाखतीत सिमी गरेवाल यांनी करीना कपूरला प्रश्न विचारला होता की, “जर तुला कोणाला डेटवर घेऊन जायची संधी मिळाली, तर तू कोणाला निवडशील?” या प्रश्नाला उत्तर देताना करीना थोडी संकोचली आणि म्हणाली, “मला हे बोलावं का, मला नाही वाटत हे बोलणं योग्य आहे, कारण हे थोडं वादग्रस्त ठरू शकतं. पण ठीक आहे, मी राहुल गांधी यांना डेट करू इच्छिते. मला त्यांना जाणून घ्यायला आवडेल.” मी त्यांचे फोटो पाहते आणि मला वाटते की त्यांना जाणून घेणे मनोरंजक असेल. पुढे तिने यामागचे कारणही सांगितले. ती म्हणाली, “ते एका राजकीय कुटुंबातून येतात आणि मी फिल्मी कुटुंबातून आहे. त्यामुळे आमच्यात खूप चांगली चर्चा होऊ शकते.” (हेही वाचा – सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच, अहवालात खळबळजनक खुलासे)
करीनाच्या या उत्तराने सिमी गरेवाल यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता आणि त्यांनी हसून यावर प्रतिक्रिया दिली होती. मात्र, नंतर करीना या विधानापासून काहीशी दूर गेली आणि तिने याला फारसं महत्त्व दिलं नाही. (हेही वाचा : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तुमचं पाणी पितोय, तुम्हाला माहित आहे काय ?)
करीना आणि सैफचं नातं
करीनाने ही मुलाखत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात दिली होती, जेव्हा ती अजून सैफ अली खान याच्याशी लग्नबंधनात अडकली नव्हती. नंतर 2008 मध्ये ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर करीना आणि सैफ यांची भेट झाली आणि त्यांच्यात प्रेम फुललं. 2012 मध्ये या जोडप्याने लग्न केलं आणि आज त्यांना दोन मुलं, तैमूर आणि जेह आहेत. करीना आणि सैफ हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जातात. मात्र, तिच्या या जुन्या मुलाखतीमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
कपूर आणि गांधी यांचा कुटुंबीय संबंध | Kapoor and Gandhi
करीना कपूर आणि राहुल गांधी यांच्या कुटुंबांमध्ये एक ऐतिहासिक संबंधही आहे. असं म्हटलं जातं की, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांचा मुलगा राजीव गांधी यांचं लग्न कपूर खानदानातील मुलीशी करायचं होतं. पत्रकार रशीद किदवई यांच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. मात्र, राजीव गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याशी लग्न केलं आणि ही इच्छा अपूर्ण राहिली. (हेही वाचा : धक्कादायक : भाजप नेत्याने पत्नी आणि 3 मुलांवर झाडल्या गोळ्या; तिन्ही मुलांचा मृत्यू)
करीनाने तिच्या या जुन्या विधानाला आता फारसं महत्त्व दिलेलं नाही. तिच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, ती सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच ती रोहित शेट्टी यांच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय ‘क्रू’, ‘हिरोईन’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमधून तिने आपली अभिनयाची छाप पाडली आहे.