Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : मालमत्ताकर भरण्यासाठी महानगरपालिकेची कॅश काऊंटर रात्री १२ पर्यंत उघडी राहणार

दिनांक २८ मार्च पर्यंत सायं ९ तर २९ ते ३१ मार्चरोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार मालमत्ताकर भरणा केंद्रे (कॅश काऊंटर्स) (PCMC)

---Advertisement---

सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा काऊंटर्स सुरु ठेवण्याचा करसंकलन विभागाचा निर्णय

नागरिकांच्या सोयीसाठी करसंकलन विभागाची विशेष सेवा…

---Advertisement---

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना करदात्यांना आपला कर भरण्यास सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने करसंकलन कार्यालये व कॅश काऊंटर्स २९ मार्चपर्यंत सकाळी ९.४५ ते रात्री ०९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत असे करसंकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (PCMC) (हेही वाचा – सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच, अहवालात खळबळजनक खुलासे)

त्याचबरोबर, शनिवार २९ मार्च, रविवार ३० मार्च, गुढीपाडव्याच्या दिवशी व ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत (शेवटचा व्यक्ती येईपर्यंत) कॅश काऊंटर्स सुरु ठेवण्याचा निर्णय करसंकलन विभागाने घेतला असून नागरिकांनी तात्काळ आपल्या कराचा भरणा करण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे. (हेही वाचा : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तुमचं पाणी पितोय, तुम्हाला माहित आहे काय ?)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ताकर वसुलीचे १००० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने महापालिकेमार्फत नागरिकांना विविध माध्यमातून कराचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर कालावधीमध्ये मालमत्ताकर भरण्यासाठी कॅश काऊंटर्स (भरणा केंद्रे) उशिरापर्यंत चालू राहतील. तसेच सदर काऊंटर्स अगदी गुढीपाडवा असला तरी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही चालू राहतील, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली. (PCMC) (हेही वाचा : धक्कादायक : भाजप नेत्याने पत्नी आणि 3 मुलांवर झाडल्या गोळ्या; तिन्ही मुलांचा मृत्यू)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles