Wednesday, June 26, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडीची मागून धडक, अनेक प्रवासी जखमी

मोठी बातमी : कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडीची मागून धडक, अनेक प्रवासी जखमी

Kanchenjunga Express : पश्चिम बंगालमधील रंगपानी स्थानकाजवळ आज सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. येथे उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की कांचनजंगा एक्स्प्रेस (Kanchenjunga Express) ट्रेनच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू आणि जखमी झाल्याचे वृत्त आहे.

पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे उभ्या असलेल्या एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 8 प्रवाशांचाही मृत्यू तर 30 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. कांचनजंगा एक्सप्रेसला रंगपाणी ते निजाबारी दरम्यान अपघात झाला आहे. ते सियालदहला जात होते.

Kanchenjunga Express चा भीषण अपघात

Kanchenjunga Express गाडी निजबारीसमोर उभी असताना पाठीमागून येणाऱ्या मालगाडीने भरधाव वेगात असलेल्या गाडीला धडक दिली. माहिती मिळताच पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. रुळावरून बोगी हटवून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कांचनजंगाच्या तीन बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात 8 प्रवाशांचाही मृत्यू तर 30 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. रंगा पाणी आणि निजबारी स्थानकादरम्यान हा अपघात झाला. ट्रेन नुकतीच न्यू जलपाईगुडीहून निघाली होती आणि किशनगंज मार्गे सियालदहला जात होती. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी एक टीम पाठवली आहे.

एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, तो ट्रेनमध्ये बसला होता तेव्हा मागून जोरदार धक्का बसला. त्यांना काही समजताच प्रवाशांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाली. सर्वत्र जोरदार किंकाळ्या आणि आवाज ऐकू येत होते. तोही ट्रेनमधून खाली उतरला आणि मागे धावला

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना

ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 164 पदांची भरती

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय